Top News अहमदनगर महाराष्ट्र

“पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री ठाकरी बाणा दाखवणार का?”

Photo Credit- uddhav Thackeray twiter account, pooja chavan facebook account

अहमदनगर | सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पूजा चव्हाण या तरूणीने आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पूजा चव्हाण आणि महाविकास आघाडीमधील शिवसेनेच्या मंत्र्यांचं नाव जोडलं जात आहे. त्यासोबतच काही ऑडिओ क्लिप्सही व्हायरल झाल्या आहेत त्यामुळे विरोधी पक्षानेही प्रकरण लावून धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

तुम्ही शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहात. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ठाकरी बाणा दाखवणार का?, असा सवाल करत प्रवीण दरेकरांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. शिर्डीत दरेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज शिवसेनेच्या एका मंत्र्याशी सुसंगत आहे. त्यामुळे या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी करून जनतेच्या समोर सत्य यायला हवं, असंही दरेकर यांनी म्हटलं आहे. याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावरून पत्र लिहित व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप डीजींना पाठवत प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, भाजप नेत्या आणि महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनीही शिवसेनेचे नेते आणि वन मंत्री असलेल्या संजय राठोड यांचं नाव घेतलं पूजाच्या आत्महत्येला राठोड जबाबदार असल्याचं म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या-

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर आदित्य ठाकरे म्हणाले…

प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच- शरद पवार

पुणे-नगर-औरंगाबाद रस्त्याबाबत नितीन गडकरी यांची आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा

“धर्म परिवर्तन करणाऱ्या दलितांना राजकीय आरक्षण मिळणार नाही”

लाचारी पत्करण्यापेक्षा काँग्रसने सत्तेतून बाहेर पडावं- राधाकृष्ण विखे-पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या