बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राहुल गांधी जिंदाबाद घोषणा दिल्यावर माणसाचं सोडा बैलालाही ते सहन झाले नसावं”

मुंबई | काही दिवसांपासून वाढत जाणाऱ्या इंधनांच्या दरांविरोधात मुंबईत काँग्रेस नेत्यांनी बैलगाडीतून मोर्चा काढला होता. मात्र बैलगाडीवर प्रचंड वजन वाढल्याने ती कोसळली आणि बैलगाडीत असणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबर काँग्रेस नेते जमिनीवर कोसळले. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्नविण दरेकर यांनी टीका केली आहे.

राहुल गांधी जिंदाबाद अशा घोषणा देत असताना माणसाचे तर दुरंच राहिले, पण बैलालाही ते सहन झालं  नसावं, असं प्नविण दरेकर यांनी म्हटलं आहे. इंधन दरवाढी विरोधातील मोर्च्यात एकाच वेळी या बैलगाडीवर अनेक कार्यकर्ते व नेते उभे होते. त्यामुळे बैलगाडीचा एक भाग तुटून वेगळा झाला आणि कार्यकर्ते खाली पडले. कार्यकर्त्यांनी बैलगाडीवर चढतांना तेथील महिलांचाही विचार केला नसल्याचं दरेकर म्हणाले.

एका बाजूला राज्य सरकार कोरोना वाढल्याचं ओरडून ओरडून सांगत असताना, दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील नेते आणि कार्यकत्यांनी आंदोलनाच्या नावाखाली सोशल डिस्टंसिंग फज्जा उडवला आणि करोनाचे नियमही  पाळले नसल्याचं म्हणत दरेकरांनी निशाणा साधला. याआधी फडणवीसांनीही यावरून गांधींना टोला हाणला आहे.

दरम्यान,काँग्रेस नेते राहुल गांधींना राष्ट्रीय नेता बोलल्याचं बैलांना देखील आवडलेलं दिसत नाही. त्यामुळे ती बैलगाडी तुटली, असं म्हणत फडणवीसांनी राहुल गांधींना टोला हाणला आहे.

थोडक्यात बातम्या-

“काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष, काका-पुतण्याच्या ताटाखालचे मांजर नाही”

सकारात्मक बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात आज आढळले फक्त 2 कोरोनाबाधित रुग्ण

दिलासादायक! पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा आजची आकडेवारी

‘राज्याचे मुख्यमंत्री बेशरम आहेत’; आमदार रवी राणांची जीभ घसरली

महाराष्ट्रात आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, पण धोका अद्याप टळलेला नाही! 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More