नवी दिल्ली | पंचायत राज मंत्रालयाकडून ग्रामीण भारतासाठी आज महत्वाची योजना लाँच करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जमीनीच्या मालकांना स्वामित्व योजनेअंतर्गत संपत्ती कार्ड वितरित करण्याच्या योजनेला सुरुवात करणार आहेत.
स्वामित्व योजनेमध्ये तब्बल 1 लाख जमीन मालकांना त्यांच्या मोबाईलवर एमएमएस येणार आहे. यामध्ये असलेल्या लिंकद्वारे हे माल त्यांचे संपत्ती कार्ड डाऊनलोड करू शकतील.
या योजनेनुसार भूधारक त्यांची संपत्तीचा आर्थिक संपत्तीसारखा वापर करू शकणार आहेत. या संपत्तीचा उपयोग कर्ज घेणं किंवा अन्य आर्थिक लाभ घेण्यासाठी केला जाऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
“तैमूरने देखील मोठं झाल्यावर हिरोच बनावं”
…तुम्ही कुणाच्या कडेवर आहात हे विचारणार नाही- रोहित पवार
सत्तेची स्वप्न पाहू नका, आम्हीही तुमचे बाप आहोत- चंद्रकांत पाटील
हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीनपदी दुसऱ्यांदा मराठमोळ्या श्रीकांत दातार यांची नियुक्ती