नवी दिल्ली | रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. युक्रेनमधील भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारला मोठी कसरत करावी लागत आहे. युक्रेनमधून अंदाजे 14,000 भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा ही मोहिन भारत सरकारने सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेत युक्रेनसह विविध मुद्यांवर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.
सरकारने ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमधून सुरू असलेल्या बचाव मोहीमेत भारतीय हवाई दलाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवाई दल युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी मंगळवारपासून काही सी-17 विमाने तैनात करण्याची शक्यता आहे. आतापर्यंत फक्त खासगी भारतीय विमाने रोमानिया आणि हंगेरिमधून बाहेर काढत होते.
युक्रेनकडून हवाई क्षेत्र 24 फेब्रुवारीपासून बंद करण्यात आले आहे. युक्रेनने हवाई क्षेत्र बंद केल्यानंतर भारताने 26 फेब्रुवारीला युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये अडकलेल्या 14 हजार नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सुरू केलं होतं. याअगोदर केंद्र सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी 4 केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनशेजारील देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, सोमवारी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य शिंदे आणि निवृत्त जनरल व्हि. के सिंग, किरण रिजिजू यांना शेजारील देश हंगेरी, रोमानिया-मोल्दोव्हा, पोलंड आणि स्लोव्हाकिया येथे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या पंधरा दिवसांमध्ये 8 हजार भारतीय युक्रेनमधून परतल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
थोडक्यात बातम्या-
निलेश राणेंच्या नव्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ, म्हणाले…
“लवासाप्रकरणी शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही”
“सरकार त्यांचं मुख्यमंत्री त्यांचे मग राऊतांना पंतप्रधान कार्यालय कशाला हवं?”
“उद्धव ठाकरे तात्काळ नवाब मलिकांचा राजीनामा घ्या, अन्यथा…”
…अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; युक्रेनमधील काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर
Comments are closed.