बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“खडसे आणि महाविकास आघाडीतील पक्ष मिळून भाजपचे राज्यातील वर्चस्व कमी करू”

मुंबई | नुकतंच एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. यावर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी खडसेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “खडसे आणि आम्ही महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मिळून राज्यामधील भाजपाचं वर्चस्व कमी करू.”

चव्हाण पुढे म्हणाले, “खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांवर रोष दाखवला. खडसेंना चांगली वागणूक मिळाली नाही. त्यांच्याबद्दल छळवाद झालाय असा त्यांनी आरोप केलाय. त्यांनी पक्षांतर केलं असून खडसेंना माझ्या शुभेच्छा.”

“दरम्यान निवडणूक जिंकण हा एवढाच केंद्र सरकारसमोरचा विषय आहे. बाकी इतर विषयांचं देणं घेणं नसल्याची,” टीका पृथ्वीराज चव्हाण यांची केंद्र सरकारवर केलीये.

महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई, महाराष्ट्राचं मीठ खायचं आणि नमकहरामी करायची; मुख्यमंत्र्यांचा कंगणावर हल्लाबोल

“देवेंद्र फडणवीस लवकर बरे व्हा, आम्हाला लढण्यासाठी समोर तगडा पैलवान हवा आहे”

दुसऱ्यांची पिल्लं वाईट, मग यांनी ‘श्रावणबाळ’ जन्माला घातलाय का?- नितेश राणे

राज्यातील तरूणांनी उद्योगधंद्याकडे वळावं; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More