मनोरंजन

सासूनं प्रियांका चोप्राला बनवलं घोडा; अशी घेतली तिची मज्जा; पाहा व्हिडीओ-

नवी दिल्ली | अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिची सासू डेनिस मिलर हिला एका खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियांकाच्या टीम प्रियांका या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या सासूसोबतचा एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओच्या कॅप्शनला हॅप्पी बर्थडे ममा जोनास, तुम्ही मला देत असलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद.

विशेष गोष्ट म्हणजे हा व्हीडिओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हीडिओमध्ये प्रियांका चोप्रा चक्क घोड्यासारखी खिंकाळताना दिसतेय. तर तिची सासू डेनिस मिलर तिच्या मागे धावतेय. या व्हीडियोमध्ये प्रियांका आणि तिची सासू खूप मजा घेत असल्याचं दिसून येतंय.

या व्हिडिओ मध्ये प्रियंका आणि तिची सासू डेनिस मजेशीर अंदाजात दिसत आहेत. व्हिडिओमध्ये प्रियंका घोड्यासारखा आवाज काढत पळत आहे. त्यातच तिची सासू मागून ड्रेसच्या नाॅट्स पकडून प्रियंकाला पळवत आहे.

2018 मध्ये प्रियांका आणि निकचे लग्न झाले. तेंव्हापासून हे दाम्पत्य न्यूयॉर्क आणि लॉस एंजेलिस या दोन्ही ठिकाणी थोडा थोडा काळ रहात आले आहेत. त्यातच प्रियांका तिच्या सिनेमांच्या प्रमोशन, शुटिंग आणि प्रॉडक्‍शनच्या कामासाठी अधुन मधून मुंबईला येत जात असते.

महत्वाच्या बातम्या-

‘ही’ माझी सर्वात आवडती ट्रॉफी- अजिंक्य रहाणे

राज्यात आज 7975 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, पाहा तुमच्या भागात किती?

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कंगणा भडकली, म्हणाली….

समोर आलं कोरोनाचं नवं लक्षण; दिसत असेल तर लगेचच हाॅस्पिटल गाठा!

‘नया है वह’ म्हणणाऱ्या फडणवीसांना आदित्य ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या