मुंबई | प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा (Pandit Shivkumar Sharma) यांचं मंगळवारी मुंबईत निधन झालं आहे. ‘संतूर सम्राट’ म्हणून ओळखले जाणारे पंडित शिवकुमार शर्मा यांनी वयाच्या 84व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या सहा महिन्यांपासून पंडित शिवकुमार शर्मा किडनीशी संबंधित आजाराने त्रस्त असून डायलिसिसवर होते. अखेर पं. शिवकुमार शर्मा यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी मनोरमा व पुत्र राहुल शर्मा असा परिवार आहे.
पं. शिवकुमार शर्मा हे संतूर या वाद्यावर शास्त्रीय संगीत वाजवणारे पहिले संगीतकार मानले जातात. त्यांनी संतूर वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून दिली. शास्त्रीय संगीताला नव्या उंचीवर पोहचवण्यात देखील पं. शिवकुमार शर्मा यांचं योगदान मोठं आहे.
दरम्यान, बासरी वादक हरिप्रसाद चौरासिया व पं. शिवकुमार शर्मा यांची जोडी ‘शिव-हरी’ नावाने खूप गाजली. या जोडीने एकत्र अनेक हिट चित्रपट संगीतबद्ध केले आहेत. सिलसिला, फासले, चांदणी, लम्हे, डर यांसारख्या सुपरहिट चित्रपटांना या जोडीने संगीत दिलं आहे. पं. शिवकुमार शर्मा यांच्या निधनाची बातमी समोर येताच कलाविश्वात शोककळा पसरली आहे.
थोडक्यात बातम्या-
‘…तर आज राज ठाकरे सुद्धा मुसलमान असते’; रामदास आठवलेंच्या वक्तव्याने खळबळ
पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! आता ‘या’ गोष्टीसाठीही मोजावे लागणार पैसे
“…त्यांना मी परवडणार नाही”, बॉलिवूडबद्दल महेश बाबू बेधडक बोलला
‘राज ठाकरे चुहा है’, भाजप खासदाराच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ
टेंशन वाढलं! राजेश टोपेंनी दिले कोरोनाच्या चौथ्या लाटेचे स्पष्ट संकेत
Comments are closed.