Top News कराड महाराष्ट्र

“दिल्लीतील शेतकरी आंदोलन हिंसक होण्यास पंतप्रधान जबाबदार”

कराड | दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे.  आज प्रजासत्ताकदिनादिवशी शेतकरी आणि पोलीस यांच्यामध्ये चकमक पाहायला मिळाली. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

मोदी सरकारनं असं काहीही न करता अत्यंत हटवादी भूमिका घेऊन हे कायदे पास करून घेतले आहेत. राजधानी दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी संपूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

कृषी कायदे पास करत असताना लोकसभेत बहुमत असताना राज्यसभेत बहुमत नव्हतं. राज्यसभेतील सदस्यांना निलंबित करून बहुमत तयार करून हे कायदे पास केलं. शेतकऱ्यांसाठी काही करायचॉं असल्यास शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना आधी विश्वासात घ्यायला हवं, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या घटनेची तीव्र शब्दात निंदा करत असून मोदी सरकारने हटवादीपणा सोडून कृषी विधेयक मागे घ्यावीत, अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाणांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

दिल्लीतील शेतकरी-पोलिसांच्या चकमकीत एका शेतकऱ्याचा मृत्यू

सरकार याच दिवसाची वाट पाहत होतं का?- संजय राऊत

संतप्त शेतकऱ्यांमध्ये अडकला होता पोलीस कर्मचारी, मदतीसाठी एक शेतकरीच धावला!

रेणू शर्माने बलात्काराचा आरोप मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

हिंसेनं कोणत्याही समस्या सुटू शकत नाही- राहुल गांधी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या