Top News विधानसभा निवडणूक 2019

शरद पवारांनी सांगितल्यानेच काँग्रेसने शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र दिलं नाही- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितल्यानेच काँग्रेसने शिवसेनेला राजीनाम्याचं पत्र थांबवलं, असा गौप्यस्फोट राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना हा गौप्यस्फोट केला.

शिवसेनेशी प्रत्येक मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे आणि ती चर्चा झाल्याशिवाय सेनेला पाठिंब्याचं पत्र द्यायचं नाही, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आणि ती भूमिका काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना देखील पटली आणि त्यामुळेच दोन्ही पक्षांनी लगोलग पाठिंब्याचं पत्र सेनेला दिलं नाही, असं चव्हाण यांनी सांगितलं.

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी 11 नोव्हेंबर रोजी केंद्रिय मंत्रिपदाचा राजीनामा दिला म्हणजे शिवसेना अधिकृतरित्या 11 तारखेला एनडीएमधून बाहेर पडली आणि त्यानंतर शिवसेनेशी आम्ही चर्चा करणं सुरू केलं, असंही चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीआणि आमचे इतर त्यांच्यात सर्व मुद्द्यांवर चर्चा होईल. किमान समान कार्यक्रम ठरवला जाईल, सत्ता वाटणीच्या सूत्रांवर चर्चा होईल आणि मगच सेनेविषयीचा निर्णय घेतला जाईल, असंही चव्हाण म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या