देश

“विधान परिषदेत सावरकरांचा फोटो लावणं हा स्वातंत्र्यवीरांचा अपमान”

लखनऊ | उत्तर प्रदेशमध्ये विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर विधान परिषद सभागृहाची डागडुजी करण्यात आली. यावेळी सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो लावण्यात आला. यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो तातडीने काढून टाका, असं काँग्रेसचे विधान परिषद सदस्य दीपक सिंह यांनी म्हटलं आहे. त्यांनी यासंदर्भात विधान परिषदेचे सभापती रमेश यादव यांना पत्र  लिहिलं आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वतःची सुटका करून घेण्यासाठी इंग्रजांना पत्र लिहून माफी मागितली होती, हे संपूर्ण देशाला माहिती आहे. भाजपने इतिहास शिकण्याची गरज आहे, असं अखिलेश यादव यांनी म्हटलं.

विधान परिषदेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो लावणे म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

‘शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ आहे’; ‘या’ भाजप नेत्याची बोचरी टीका

भाजपने निलेश राणेंवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

ठाकरे सरकार कधी पडेल हे मी आता सांगणार नाही, कारण…- नारायण राणे

“धनंजय मुंडे यांचा जीव शरद पवार नावाच्या पोपटात अडकला आहे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या