बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेेनेसोबतच्या युतीबाबत राधाकृष्ण विखे-पाटील यांचं मोठं वक्तव्य, म्हणतात…

अहमदनगर | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल औरंबादेतील एका कार्यक्रमात विरोधकांचा उल्लेख भावी सहकारी असा केला होता. त्यानंतर भाजप नेत्यांनी युतीचे संकेत दिले होते. आता भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी युतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल काय वक्तव्य केलं याची मला कल्पना नाही. मात्र ते त्यांचं व्यक्तिगत मत होतं. पण एक नक्की. राजकारणात कोणीही कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कुणाचा मित्रंही नसतो. त्यामुळे काही चमत्कार होऊ शकतो, असं ते म्हणाले.

महाविकास आघाडीची जी मोट बांधली गेली आहे. त्याला काही वैचारिक आधार नाही. सत्तेसाठी हे लोक एकत्रं आले आहेत. सत्ता नसतानाही शिवसेना-भाजपने 20-25 वर्ष एकत्र राहून काम केलं आहे. त्यामुळे आगामी काळात हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे, असं विखे-पाटील म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसने आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. पक्षाचं हित पाहण्यापेक्षा व्यक्तिगत हित पाहण्याकडे काँग्रेसच्या मंत्र्यांचं लक्ष आहे. तर काँग्रेसने आता मुंगेरीलालचे स्वप्न पाहू नयेत, अशी टीकाही त्यांनी केली.

थोडक्यात बातम्या- 

सलग दुसऱ्या दिवशीही अनिल देशमुखांच्या मालमत्तेवर आयकर विभागाची छापेमारी

करुणा शर्मांच्या अडचणींत वाढ, आणखी दोन दिवस रहावं लागणार कोठडीत

‘दिवाळीपूर्वीच अनिल देशमुख तुरुंगात जाणार, त्यानंतर…’; सोमय्यांच्या वक्तव्याने खळबळ

मोठी बातमी! ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ रुग्णालयात दाखल

पुढील दोन-तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More