पुणे | झपाटलेला या मराठीतील अत्यंत लोकप्रिय चित्रपटात बाबा चमत्कारची भूमिका करणारे राघवेंद्र कडकोळ यांचं दीर्घ आजारानं निधऩ झालं आहे. त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला.
झपाटलेला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लक्ष्मीकांत बोर्डे, तात्या विंचू यांच्यासह बाबा चमत्कार यांची पात्रं अजरामर झाली होती. त्यांना या चित्रपटाने चांगलीच प्रसिद्धी दिली. त्यांचा तात्या विंचूल जिवंत करण्याचा अभिनय सर्वांना चांगलाच आवडला होता.
दरम्यान, अभिनयात येण्याआधी त्यांनी देशसेवा करण्याची तयारी केली होती. मात्र वैदयकीय कारणामुळे त्यांना नौदलात सहभागी होता आलं नाही. त्यानंतर ते अभिनयाकडे वळले होते.
सुरुवातीच्या काळात त्यांनी नाटकात काम केले होते. अश्रूंची झाली फुले, रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या, मात्र बाबा चमत्कारमुळे त्यांना खरी लोकप्रियता मिळाली होती. त्यांच्या जाण्यानं सिनेक्षेत्रात शोक व्यक्त केला जातोय.
ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र (अण्णा) कडकोळ यांचे निधन झाले.त्यांच्या निधनामुळे रंगभूमी व रुपेरी पडद्यावर सहजपणे वावरणारे चतुरस्त्र अभिनेते काळाच्या पडद्याआड गेले.भावपूर्ण श्रद्धांजली.
— Supriya Sule (@supriya_sule) February 4, 2021
थोडक्यात बातम्या-
यशोमती ठाकूर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर केला ‘हा’ गंभीर आरोेप!-
“प्रभू श्रीरामाने शेतकऱ्यांची बाजू घेतली तर भक्त त्यांनाही देशद्रोही ठरवतील”
नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा!
शरजील उस्मानीच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर उर्मिला मातोंडकरांचं रोखठोक मत, म्हणाल्या…
‘अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली’; भाजपच्या या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य