बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हे कसलं सरकार आहे ज्यांना सभागृह देखील सांभाळता येत नाही”

नवी दिल्ली | काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संसदेतील स्थगन प्रस्तावांवरून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मोदी सरकार महत्वपूर्ण मुद्दे उपस्थित करत असलेल्या विरोधकांना रोखत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.

‘महागाई, लखीमपूर, पेगॅसिस, लदाख, एमएसपी, निलंबित सदस्य यासारख्या मुद्द्यावरून आमचा आवाज दाबला जाऊ शकत नाही. हिंमत असेल तर चर्चा होऊ द्या’, असं आव्हानही राहुल गांधी यांनी मोदी सरकारला (Modi Goverment) दिलं आहे.

मोदी सरकार लोकशाहीची हत्या करत आहे. हे कसलं सरकार आहे ज्यांना सभागृह सांभाळता येत नाही, असा घणाघातही राहुल गांधी यांनी केला आहे.तर पंतप्रधान सभागृहातून गायब का? असा सवाल देखील राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) व समाजवादी पार्टीनेदेखील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप सरकार विरोधकांना भीती दाखवत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

थोडक्यात बातम्या-

म्हाडाची परिक्षा ऑनलाईन पद्धतीनेच; पेपर फुटीनंतर नवी तारीख जाहीर

‘…कदाचित खूप उशीर झाला आहे’; Omicron बाबत धक्कादायक माहिती आली समोर

पेपर फुटी प्रकरणी ठाकरे सरकारची मोठी कारवाई; आयुक्त तुकाराम सुपे निलंबित

जिवा शिवाची बैल जोड़! रावसाहेब दानवेंचा पत्नी आणि नातीसह बैलगाडीतून फेरफटका

‘हा’ बहुप्रतिक्षित IPO शेअर बाजारात धडकणार; गुंणतवणूकदांरांंना मोठी संधी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More