बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज ठाकरेंचा पक्ष संपलाय, ते प्रत्येक प्रकरणात सेटलमेंट करतात; अबू आझमींचे टीकास्त्र

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पक्ष संपलाय आणि ते प्रत्येक प्रकरणात सेटलमेंट करतात, अशी जोरदार टीका समाजवादी पक्षाचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी राज ठाकरे यांच्यावर केली.

राज ठाकरे हे मिमिक्री आर्टीस्ट आहेत. मेहमूद आणि असरानी यांच्यासारख्या कलाकारांना लोक ऐकायचे तसं राज ठाकरेंनाही ऐकतात, असंही अबू आझमी म्हणाले.

भाजपच्या पापाचा घडा भरला आहे, उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 50 टक्के नुकसान होईल, असं म्हणत अबू आझमी यांनी भाजपवरही निशाणा साधला.

राज ठाकरेंमुळे परप्रांतियांना मारहाण झाली होती हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी विसरले आहेत. राज ठाकरेंना सोबत घेतल्यामुळे काँग्रेस आणि महागठबंधनला राज्याच्या बाहेर नुकसान होईल, असा दावाही त्यांनी केला.

महत्वाच्या बातम्या

ममतांच्या भाच्याने पाठवली मोदींना अब्रुनुकसानीची नोटीस; मोदींच्या अडचणीत वाढ!

-सात राज्यात 59 जागांसाठी 918 उमेदवार आज निवडणुकीच्या रिंगणात

-निवडणूक काळात नरेंद्र मोदींचा 1.5 लाख किमी हवाई प्रवास, घेतल्या 142 सभा

-रिक्षा चालकाला शिवीगाळ केल्या प्रकरणी पोलिसाला 50 हजारांचा दंड

“दगडात देव मानणारा नेता कुठं अन् रयतेलाच देव मानणारा नेता कुठं?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More