बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजस्थानची चिंता मिटली! आयपीएलआधी ‘या’ नव्या खेळाडूची तुफान खेळी

मुंबई | येत्या 19 तारखेपासून आयपीएलच्या दुसऱ्या सत्राला सुरूवात होत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना रद्द करावा लागला होता. त्यानंतर आता सर्व भारतीय खेळाडूंची कोरोना टेस्ट दुसऱ्यांदा निगेटिव्ह आल्यानं आता आयपीएल खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र इंग्लंडच्या तीन खेळाडूंनी आयपीएल खेळण्यास नकार दिल्यानं राजस्थान राॅयल्सच्या चिंतेत वाढ झाली होती.

जोस बटलर, बेन स्टाेक्स आणि जोफ्रा आर्चर या इंग्लंडच्या तीन खेळाडूंनी आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. हे तिन्ही दिग्गज खेळाडू राजस्थान राॅयल्स या संघासाठी खेळतात. राजस्थान राॅयल्सने मंगळवारी जोस बटलर आणि बेन स्टाेक्स या दोघांच्या बदली नावाची यादी जाहीर केली आहे. वेस्ट इंडिजचा सलामीवीर एव्हिन लुईस आणि ओशाने थाॅमस या गोलंदाजाला संघाने करारबद्द केलं आहे.

जोस बटलर, बेन स्टाेक्स आणि जोफ्रा आर्चर या तिघांच्या उपस्थितीविना संघनिवडीसाठी राजस्थान राॅयलवर मोठं संकट कोसळलं होतं. मात्र, नुकताच संघात स्थान मिळवलेल्या एव्हिन लुईसने तुफानी खेळी करत आगमनाचे संकेत दिले आहेत. लुईसने काॅरिबियन प्रिमियर लीगमध्ये तुफानी शतक झळकावलं आहे. बाॅलिबूड सुपरस्टार शाहरूख खान याचा संघ असलेल्या त्रिनबागो नाईट रायडर्सविरूद्ध त्याने तुफानी खेळी केली आहे.

दरम्यान, सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्सकडून खेळताना एव्हिन लुईसने केवळ 51 चेंडूत शतक झळकावलं आहे. यात त्याने 11 षटकार तर 5 चौकार खेचले. मागील दोन वर्षापासून लुईस चांगल्या फाॅर्ममध्ये आहे. गेल्या दोन वर्षात त्याने 5 टी-ट्वेंटी शतक ठोकली आहेत. त्यामुळे राजस्थान राॅयलने मोठा दिलासा मिळाला आहे.

थोडक्यात बातम्या-

बेरोजगार युवकांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय!

“हवेत गोळीबार करू नका, चंद्रकांत पाटलांना अफवा पसरवण्याची सवय”

साकीनाका प्रकरणानंतर नीलम गोऱ्हे आक्रमक; मुख्यमंत्र्यांना दिले ‘हे’ सल्ले

ठाण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दोन ठार; एकजण गंभीर जखमी

परभणीत काळीज पिळवटून टाकणारा अपघात; मॉर्निंग वॉकला गेलेल्या चौघांना ट्रकनं चिरडलं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More