बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अजित पवार यांच्यावरील कारवाई योग्यच, पण…- राजू शेट्टी

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीय यांच्यावर पडलेल्या आयकर विभागाच्या धाडीचीच चर्चा संपुर्ण महाराष्ट्रभर रंगत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच यावरून राजकीय वर्तुळात मात्र अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. याच प्रकरणात आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

राजू शेट्टींनी अजिप पवार यांच्यावर झालेली कारवाई योग्यच असल्याचं मत व्यक्त केलं आहे. अशा कारवाया होतात पण याचा शेवट कुठेही दिसत नाही, केवळ राजकीय स्वार्थासाठी या कारवाया केल्या जातात का? तसेच यंत्रणांचा वापर राजकीय कारणासाठी केला जातो का?, असा प्रश्नही राजू शेट्टी यांनी या माध्यमातून भाजपला विचारला आहे.

अजित पवारांच्या निकटवर्तीय आणि नातेवाईकांवर पडलेली धाड ही राजकीय सुडबुद्धीने भाजपने घडवून आणली असा आरोपही करण्यात येत आहे. त्यातच आता राजू शेट्टींनी ही कारवाई योग्य असल्याचं मत व्यक्त केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. तसेच शेतकरी अडचणीत असतानाही गेल्या 18 महिन्यांपासून घरी बसलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना पगारवाढ आणि महागाई भत्ता वाढ नेमकी का केली?, असा सवालही त्यांनी यावेळी विचारला आहे.

दरम्यान, अजित पवारांच्या जवळच्या लोकांवर आयकर विभागाच्या पडलेल्या धाडीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण मात्र चांगलंच ढवळून निघालं आहे. तसेच पाहूणे गेल्यावर याबाबत अधिक बोलू, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काय गोष्टी समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत चौरंगी लढत होणार?, ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर

“भाजपच्या घोटाळेबाज नेत्यावर धाडी का नाही, काही घोटाळेबाज भाजपमध्ये आले ते पवित्र झाले का?”

आज संध्याकाळपर्यंत ‘या’ भागात होणार जोरदार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

“शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे मिळायला लागले की, भाजपला ते सहन होत नाही”

‘काही दिवसांपूर्वी रिया चक्रवर्ती होती आणि आता….’, काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More