पुणे | खरे नक्षलवादी आहेत त्यांना पकडलंच पाहिजे, शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे आणि धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आत्ताचे सत्ताधारी आणि त्यावेळचे विरोधक करत होते. मग आता राज्य सरकार कारवाई का करत नाही, असा सवाल केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी राज्य सरकारला केला आहे.
सरकार येऊन एक वर्ष पुर्ण झालं आहे मग सरकार मूग गिळून गप्प का आहे? कारवाई करायला पाहिजे. आता त्यांनी अटक करावी, असं रामदास आठवेलंनी म्हटलं आहे. पुण्यात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावर्षी कोरोनामुळे भीमा-कोरेगावला येऊ नका. घरातच सर्वांनी प्रार्थना करावी. एक जानेवारील मी सकाळी अकरा वाजता तिथे जाऊन अभिवादन करणार असल्याचं आठवले म्हणाले.
दरम्यान, आठवलेंनी केलेल्या मागणीवर सरकार काय प्रतिक्रिया येते आणि संभाजी भिडे यावर काय बोलतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या-
अॅमेझॉननंतर मनसेचा मोर्चा पश्चिम रेल्वेकडे; पत्रकांमध्ये मराठी भाषेचा वापर करण्याची मागणी
‘…की अजितदादा आमच्याकडे आलेच म्हणून समजा’; केंद्रीय मंत्र्याने केला मोठा गौप्यस्फोट
“बोरूबहाद्दर राऊत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा”
मुंबईत नवीन वर्षाची गच्चीवरही ‘नो पार्टी’; देखरेखीसाठी 35 हजार पोलीस तैनात
पार्थ पवारांना उमेदवारी मिळणार का?; रोहित पवार म्हणतात…