नवी दिल्ली | गेल्यावेळी मंत्रीपदाची शपथ घेताना गडबडलेले रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी यावेळी मात्र न चुकता पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.
गेल्यावेळच्या मोदींच्या मंत्रीमंडळात रामदास आठवले यांच्या सामाजिक न्याय राज्यमंत्रीपद हे खातं होतं. यंदाही त्यांच्याकडे तेच खातं राहण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महाराष्ट्रातून आत्तापर्यंत नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, डॉ. अरविंद सावंत, रावसाहेब दानवे आणि रामदास आठवले यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.
दरम्यान, मोदींच्या नव्या मंत्रीमंडळातील राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, डी व्ही सदानंद गौडा, निर्मला सितारामण, रामविलास पासवान, नरेंद्र सिंह, रविशंकर प्रसाद यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या
-रावसाहेब दानवेंनी घेतली मंत्रीपदाची शपथ; प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी??
-नरेंद्र मोदींच्या मातोश्रीने घरात बसून अनुभवला मुलाचा शपथविधी सोहळा
-नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली
-या भाजपच्या डॅशिंग आणि धडाडत्या नेत्या मंत्रीमंडळात नसतील!
-राज ठाकरे आणि तुमच्या भेटीत काय चर्चा झाली?? शरद पवार म्हणतात…
Comments are closed.