“उद्धव ठाकरे तुम्ही सुखाने नांदा, पण होऊ देऊ नका तुमचा वांदा”
सांगली | गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात अनेक मुद्द्यांवरून राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असताना रिपाईचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सल्ला दिला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चक्रव्यूहात अडकले आहेत. त्यांना यातून बाहेर काढण्याचा मी अनेकवेळा प्रयत्न केला आहे, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे. यावेळी आठवलेंनी त्यांच्या खास शैलीत टिप्पणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांना मी एकच सल्ला देतो की, ‘तुम्ही त्या ठिकाणी सुखाने नांदा, पण होऊ देऊ नका तुमचा वांदा’, अशा शब्दात रामदास आठवलेंनी टिप्पणी दिली आहे. आठवले गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना आठवलेंनी हे वक्तव्य केलं आहे.
दरम्यान, आमचा रिपब्लिकन पक्ष वाद न करणारा व जातीय तेढ निर्माण न करणारा सर्व जातीधर्मातील लोकांना एकत्र पुढे नेणारा पक्ष आहे. मी ज्या पक्षासोबत राहतो त्या पक्षाची सत्ता येते. शिवसेनेने लोकमताचा अनादर करून सत्ता स्थापन केली, अशी टीका देखील रामदास आठवले यांनी केली आहे.
थोडक्यात बातम्या-
नवनीत राणांच्या भेटीनंतर चित्रा वाघ संतापल्या, म्हणाल्या…
प्राजक्ता माळीचा बोल्ड अंदाज, बिनाब्लाऊजच्या साडीत बघून नेटकरी संतापले
राणा दांपत्यावरील ‘ती’ कारवाई ठाकरे सरकारच्या अंगलट, न्यायालयाने सरकारला फटकारलं
झोया शेख ठरल्या ‘Mrs. Maharashtra’ किताबाच्या मानकरी
“बहुजनांना तुमच्या सारखाच शकुनी काकांचा हुजऱ्या समजू नका”
Comments are closed.