पुणे | भाजप खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्यावर मराठा मोर्चेकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांच्याविरोधात आंळदी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध व्यक्त करत बंद पाळण्यात आला आहे.
राणे पिता पुत्र मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करीत असल्याचा आव आणत आहेत. या पितापूत्रांची धडपड मराठा आरक्षणासाठी नसून वैयक्तिक मंत्रिपदाच्या लालसेसाठी असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील मराठा आंदोलनाबाबत वेगवेगळी वक्तव्य व्यक्त करून आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही आंळदी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सांगण्यात आलं.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा आंदोलन चिघळलं; मोर्चेकऱ्यांनी पुण्यात बस पेटवली
-आयोगाची वाट पाहत बसू नका, तातडीने अधिवेशन बोलवून मराठ्यांना आरक्षण द्या- उद्धव ठाकरे
-उद्घाटनाच्या श्रेयवादावरून शिवसेना- भाजप कार्यकर्ते भिडले!
-आत्महत्येपुर्वी प्रमोद पाटलांनी केला होता आईला फोन; वाचा काय म्हणाले
-घटनादुरूस्ती नेमकी कशी करावी, हे शरद पवारांनी स्पष्ट करावं- प्रकाश आंबेडकर