बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ आमदाराची ईडीकडून तब्बल 8 तास चौकशी

मुंबई | मागील काही महिन्यांपासून महाविकास आघाडीचे अनेक नेते केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजेच ईडी (ED) आणि सीबीआयच्या (CBI) रडारवर आहेत. अशातच आता शिवसेना आमदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांची ईडीने तब्बल 8 तास चौकशी केली आहे. त्यामुळे आता हिवाळी अधिवेशनाआधी राज्यात चांगलीच खळबळ उडाल्याचं दिसतंय.

रविंद्र वायकर आज हे आज ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. दुपारी 12च्या ते ईडीसमोर आले होते. त्यानंतर त्यांची तब्बल 8 तास चौकशी झाली. यात त्यांनी विविध विषयांवर त्यांना प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून रविंद्र वायकर यांनी ओळख आहे. त्यामुळे आता वायकर यांच्या चौकशीमुळे आता शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत.

दरम्यान, रविंद्र वायकर यांची नेमक्या कोणत्या प्रकरणात चौकशी झाली याबद्दल अद्याप माहिती समोर आली नाही. सध्या या प्रकरणात कमालीची गुप्ता ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता उद्याच्या अधिवेशनात या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आक्रमक होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…असं काही घडलंच नाही’; 12 आमदारांच्या निलंबनावर अजित पवारांचं मोठं वक्तव्य

“…त्याची ठाकरे सरकारला जराही शरम वाटली नाही”, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

ममतांचा जलवा कायम! भाजपला धूळ चारत पुन्हा गड राखला

नानांसह ‘या’ दोन नेत्यांना हायकमांडकडून समन्स, लगोलग दिल्लीला बोलावलं

मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना मोठा झटका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More