बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज कुंद्राच्या अडचणीत आणखी वाढ; आता आणखी एक टीम करणार चौकशी

मुंबई | अश्लील व्हिडीओ प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला 11 जुलैला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. सध्या याप्रकरणी राज कुंद्रा न्यायालयीन कोठडीत आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर या प्रकरणाशी संबंधीत असलेल्या अनेक लोकांनी समोर येत आरोप-प्रत्यारोप केलेले पाहायला मिळाले. त्यामुळे याप्रकरणी राजच्या अडचणींमध्ये वाढ पाहायला मिळाली. अशातच आता पुन्हा एकदा त्याच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे.

राज कुंद्रा प्रकरणात अनेक धागेदोरे समोर येत आहे. त्यामुळे याप्रकरणाची मुंबई ब्रांचकडून कसून चौकशी होत असलेली पाहायला मिळत आहे. अशातच आता अश्लील व्हिडीओ प्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी मुंबई क्राईम ब्रांचने एसआयटी टीम बनवली असल्याचं समोर येत आहे. याप्रकरणात अजूनही बक्कळ पुरावे असल्याचं मुंबई पोलिसांचं मत असल्यानं त्यांनी ही एसआयटी टीम चौकशीसाठी बनवली आहे.

एसआयटी ही टीम अश्लील व्हिडीओ प्रकरणातील अनेक प्रकरणाची चौकशी करणार असून चौकशीमध्ये समोर आलेला हा सर्व रिपोर्ट मुंबई ब्रांचला सोपवणार आहे. हे प्रकरण फक्त मुंबई, देशापर्यंत नाही तर विदेशांपर्यंत पसरलं आहे. त्यामुळे याप्रकरणाच्या चौकशीसाठी बनवलेल्या एसआयटी टीमचा हेड एसपी लेव्हलचा अधिकारी असणार आहे. हा अधिकारीचं या टीमचं नेतृत्व आणि मार्गदर्शन करणार असल्याचं समजतंय.

दरम्यान, राज कुंद्राला अटक झाल्यापासून याप्रकरणात त्याची पत्नी शिल्पा शेट्टीला आणि कुटुंबालाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांना समोर येत त्यांना पाठिंबा दर्शवला आहे तर अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे.

थोडक्यात बातम्या –

राज ठाकरेंचं ‘मिशन पुणे’; आजपासून दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर

‘वे डरते हैं…’; कविता ट्विट करत जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

अखेर 8 लाखांची लाच घेणाऱ्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर वीरला अटक!

“चंद्रकांत खैरे जळक्या वृत्तीचे, इम्तियाज जलील चंद्रकांत खैरेंपेक्षा चांगले खासदार”

‘राहुल गांधींना लोकसभेतून निलंबित करा’; रामदास आठवलेंची मोठी मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More