बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! पुण्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल, वाचा आजची आकडेवारी!

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा झाला असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 432 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 271 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 15 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. यामध्ये 14 जण पुण्याबाहेरील होते.

पुण्यात सध्या 252 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,80,582 इतकी आहे. तर पुण्यात 2871 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 8628 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,69,083 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 7026 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही कमी झालेली आकडेवारी अशाच प्रकारे आणखी कमी व्हायला हवी.

थोडक्यात बातम्या-  

ईडी लावाल तर सीडी लावेल म्हणणाऱ्या नाथाभाऊंनाही ईडीची नोटीस???

प्रकाश जावडेकर यांचा राजीनामा का घेण्यात आला?; वाचा सविस्तर वृत्त

“बारा वर्षात काँग्रेसला राणेंची किंमत काय आहे कळलं नाही ते भाजपच्या नेतृत्वाला कळलं”

सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, उच्चांकी दरापेक्षा 8500 रुपयांनी स्वस्त; वाचा ताजे दर

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणेंनी सर्वप्रथम घेतली शपथ

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More