56 इंचाचं तर गोदरेजचं कपाट असतं- रितेश देशमुख

मुंबई | 56 इंचाचं तर गोदरेजचं कपाट असतं, असं म्हणत अभिनेता रितेश देशमुख यांंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली आहे. रितेश देशमुखच्या वक्तव्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

केंद्रातील भाजप सरकार फक्त बढाया मारतात. प्रत्यक्षात ते ज्या गोष्टींचा वापर करतात ते सगळं काँग्रेसचं देणं आहे, असं म्हणत रितेशनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटतं की काँग्रेसने काहीच केलं नाहीये पण आपल्याला स्वातंत्र्य मिळालं हे काँग्रेसमुळे हे तुम्ही लक्षात घ्यावं, असं रितेश देशमख यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलताना रिेतेश देशमुख यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं.

महत्त्वाच्या बातम्या

-सर्व चोरांचे नाव ‘मोदी’च कसे? राहुल गांधींचा सवाल

-अर्जुनसोबत लग्न करणार का?; अखेर मलायकाने सोडले मौन

-जबरदस्त! पोलार्डने एबी डीव्हिलियर्सला केलेले रन-आऊट पाहाच एकदा!

-“चौकीदार शेतकरी-कामगारांच्या घराबाहेर नाही तर अनिल अंबानींच्या घराबाहेर असतो!”

हार्दिक पांड्या पडला ‘भारी’; बंगळुरूच्या पदरी पुन्हा निराशा