बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इंधन दरवाढीवरून रोहीत पवारांनी मोदींना दिला ‘हा’ सल्ला

मुंबई | इंधनाचे दर सध्या गगनाला भिडले असून ते आटोक्यात आणावे अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. आतापर्यंतचा उच्चांक सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने गाठला आहे. जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी नरेंद्र मोदी यांना पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करण्याबाबत एक सल्ला दिला आहे.

आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत रोहित पवार यांनी केंद्राने घेतलेल्या एक्साइस ड्यूटी कमी करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. पण राज्यांना एक्साइजमध्ये वाटा असतो. मात्र, सेसमध्ये राज्यांचा काहीही वाटा नसतो. त्यामुळे एक्साईज ऐवजी सेस कमी करण्याबद्दल विचार करण्याची विनंती रोहित पवार यांनी केंद्र सरकारला केली आहे.

सध्या संपूर्ण देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरुन सरकारवर जोरदार टीका होत आहे. समाजमाध्यमात तर अनेक व्हिडिओज आणि फोटोज् व्हायरल होत आहे. त्यामुळे आता रोहित पवार यांच्या या सूचक ट्विटमुळे मोदी सरकार आपल्या निर्णयाचा फेरविचार करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्रात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नाना पटोले आणि काँग्रेस नेत्यांनी सायकल वर विधानभवन मध्ये येऊन इंधन दरवाढीचा निषेध केला होता. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. दररोज वाढणारे पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या 2 दिवसांपासून स्थिर आहेत. पण, घरगुती गॅसच्या किंमती सध्या भडकल्या आहेत. सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागत असून सध्या त्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. यावर आता सरकार काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

सर्वसामान्यांना मोठा दिलासा; वीज बिलासंदर्भात अजित पवारांनी सभागृहात केली ‘ही’ मोठी घोषणा

भाजप नेते प्रविण दरेकरांना मोठा धक्का; वाचा काय आहे प्रकरण

धक्कादायक! भररस्यात घडलेल्या ‘या’ घटनेनं पुणे हादरलं

सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका; घरगुती गॅस सिलेंडर पुन्हा ‘इतक्या’ रूपयांनी महागला

पोलिसांत तक्रार केल्यामुळे मुलीच्या वडिलांना घातल्या गोळ्या; हाथरसमधील अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More