बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कर्जत-जामखेडची जागा महिलेला देण्याची मागणी; रुपाली चाकणकर म्हणतात…

नगर | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांची कर्जत जामखेड मतदारसंघातून उमेदवारीची मागणी आहे. मात्र याच भागातून राष्ट्रवादीच्या मंजुषा गुंड उमेदवारीसाठी आग्रही आहेत.

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांच्या मागणीनूसार जिथं महिला सक्षम आहेत तेथे महिलेला उमेदवारी मिळावी, त्यानूसार वरिष्ठांना कळवलं जाईल, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

नगर जिल्ह्यात प्रश्न वेगळे आहेत. महिलांना अभय हवं आहे. सध्याच्या सरकारमधील नेते महिलांच्या प्रश्नावर जागरुक नाहीत. त्यामुळे महिला संघटन वाढवून या प्रश्नावर लढावे लागेल, असं चाकणकर म्हणाल्या.

दरम्यान, कर्जत जामखेडमधून महिला आघाडीच्या मंजुषा गुंड उमेदवारीसाठी आग्रही आहेत. त्यामुळे या जागेवरुन आगामी काळात मोठी रस्सीखेच होणार असल्याचं दिसतंय.

महत्वाच्या बातम्या-

-तिहेरी तलाक विरोधात पहिली केस महाराष्ट्रातल्या ‘या’ शहरात दाखल!

-आठवले स्टाईल…! कविता काश्मीरवर अन् टीका काँग्रेसवर

-शरद पवारांनी आणखी मानसिक धक्क्यांची तयारी करावी -चंद्रकांत पाटील

-वीणाकडून राखी बांधून घे, शिवच्या आईचा शिवला सल्ला!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More