रशियाकडून युक्रेनच्या दहा शहरांवर बॉम्ब हल्ला, ‘इतक्या’ नागरिकांचा मृत्यू
नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष कमालीचा चिघळला आहे. रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाचं आता रूपांतर युद्धात झालं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर सैन्य कारवाईचे आदेश दिलेले आहेत. त्यातच आता रशियाच्या सैन्याने युक्रेनच्या दहा शहरांवर हल्ला केला आहे.
कीव, खार्किव, चिसिनो या भागांमध्ये रशियाच्या लष्कराने हल्ला केला आहे. रशियाकडून युक्रेनच्या लष्करी आणि हवाई विमानतळांना लक्ष करण्यात आलं आहे. क्रेमटोर्स्क, बर्दियान्स्क आणि निकोलायव्ह शहरांमध्ये स्फोट करण्यात आल्याची माहिती समोर आलीये. रशियाने केलेल्या बॉम्ब हल्यामध्ये ओडेसा इथे सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती आहे.
रशियाच्या लष्कराने युक्रेन सैन्यावरती इतका विदारक हल्ला केला आहे की, जाळपोळ पाहणं युक्रेनच्या नागरिकांना असहाय्य होत आहे. रशियाने बॉम्ब हल्ला केल्याने युक्रेनची राजधानी किव येथे देखील मोठं नुकसान झालं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन रशिया युक्रेनवर करत असलेल्या हल्यावर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष लादिमीर पुतीन यांनी ही लष्करी कारवाई असून यामुळे युक्रेनमधील नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, असं सांगितलं होतं. परंतु, या युद्धात युक्रेनमधील सामान्य नागरिकांना लक्ष्य केल्याची देखील माहिती आहे. आतापर्यंत 300 पेक्षा अधिक नागरिकांचा जीव गेल्याची माहिती युक्रेनकडून देण्यात आली आहे.
थोडक्यात बातम्या-
Russia-Ukraine War | युक्रेनसोबत रशियाचा नेमका वाद काय?, वाचा सविस्तर
रशियन सैनिकांच्या निशाण्यावर युक्रेनच्या महिला; अत्यंत धक्कादायक माहिती समोर
Russia-Ukraine War | ‘इतके’ हजार भारतीय अडकल्यानं चिंतेचं सावट
रशियाकडून युक्रेन विमानतळावर बॉम्बफेक, लाईव्ह व्हिडीओ आला समोर
Gold Rate: रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम थेट सोन्याच्या दरावर, वाचा आजचे ताजे दर
Comments are closed.