Russia Ukrain War | रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचं ‘हे’ शहर उद्ध्वस्त, इतक्या लोकांचा मृत्यू
नवी दिल्ली | युक्रेन आणि रशियामधील वादामुळे (Russia Ukrain War) संपूर्ण जग हादरुन गेलं आहे. या युद्धामुळे सगळ्याच देशांवर परिणाम झाला असून याचे पडसाद सर्वत्र पहायला मिळत आहे. आज रशिया युक्रेन युद्धाचा 34 वा दिवस आहे. अद्यापही हे युद्ध सुरु आहे.
रशियाने युक्रेनवरील हल्ले अधिक तीव्र केले असून रशियाकडून होणारे मिसाईल हल्ले, बॉम्ब हल्ले गोळीबार यामुळे युक्रेन हदरलं आहे. अशाच युद्धाविषयी आणि एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.
युक्रेनमधील मारियुपोल शहर पूर्णपणे उद्धवस्त झाल्याचं समोर आलं आहे. रशियन हल्ल्यात (Russian attack) या शहरातील 5 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक बेघर झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, गेल्या 34 दिवसांपासून रशियाकडून युक्रेनवर बॉम्बहल्ले, हवाईहल्ले तसेच क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. या हल्ल्यांत युक्रेनमध्ये मोठी जीवीत तसेच वित्तहानी झालेली आहे. या दोन्ही देशांतील युद्ध थांबावं अशी प्रार्थना सध्या सगळेजन करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
भाजपसोबतच्या मैत्रीवर आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले….
“शरद पवारांनी आयुष्यभर काड्या लावायचं काम केलं, त्यांचं नाव आगलावे करा”
Weather Update: येत्या पाच दिवसांत ‘या’ भागात उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा
रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यात युक्रेनचं कोट्यवधींचं नुकसान, ‘ही’ आकडेवारी समोर
“भाजपच्या काळ्या जादूचा आमच्यावर प्रभाव पडणार नाही”
Comments are closed.