बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोल्हापूरचं नाव कलापूर करावं’; अभिनेता सचिन पिळगावकरांची मागणी

मुंबई | कोल्हापूरचं नाव कलापूर असं करावं, अशी मागणी अभिनेता सचिन पिळगावकर यांनी केली आहे. एबीपी माझाला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी ही मागणी केली आहे.

कोल्हापूर हे त्या जागेचं नाव कधीच नव्हतं. त्याठिकाणी चित्रपटसृष्टी होती. तिथे प्रत्येक प्रकारचे कलाकार असायचे. त्यामुळे त्या ठिकाणाचं नाव कलापूर होतं. इंग्रजी त्याचा वेगळा उच्चार केला. त्यांनी कलापूरला कोल्हापूर नाव पाडलं. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की, त्याचं नाव कलापूर व्हावं, असं सचिन पिळगावकर म्हणालेत.

आज सिनेमा क्षेत्रात मोठे बदल होताना दिसत आहे. आज सिनेमा डिजीटल स्वरूपात आलाय. पण पुर्वीसारखी मजा नाही राहिली. याचा अर्थ असा नाही की मला नव्या गोष्टी मान्य नाही. मला या क्षेत्रात आता 58 वर्ष पुर्ण होत आहेत. नव्या गोष्टींचा मी देखील प्रयोग केला आहे. या क्षेत्रात मी आजही शिकत आहे, असं देखील त्यांनी म्हटलंय.

दम्यान, या मुलाखतीत त्यांनी अभिनेता महेश कोठारे यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. महाराष्ट्रात नवीन टेक्निक आणण्यात महेश कोठारे यांचं मोठं योगदान आहे, असं देखील सचिन पिळगावकर यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“महाराष्ट्राचा पंंतप्रधान झाला पाहिजे, असं मला अजिबात वाटतं नाही”

“आपण भाग्यवान म्हणून ड्रायव्हिंग लायसन्सवर आपला स्वतःचा फोटो आहे”

सेक्स व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ; भाजपचा बडा नेता अडचणीत!

मायग्रेनने ग्रस्त असलेल्या लोकांनी ‘हे’ खाऊ नये!

पीएफ खातेदारांसाठी मोठी बातमी; लवकरच खात्यात पैसे जमा होणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More