मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायलयाने बडतर्फ सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझेंना (Sachin Waze) दणका दिला आहे. सचिन वाझे यांनी जामिनासाठी विशेष पीएमएलए न्यायालयात धाव घेतली होती.
सचिन वाझे यांचा जामीन अर्ज फेटाळत न्यायालयाने वाझे यांना झटका दिला आहे. यासंदर्भात आज विशेष न्यायालयात सुनावणी पार पडली असून न्यायालयाने वाझेंचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
अँटेलिया स्फोटक प्रकरण व मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सचिन वाझेंना केंद्रीय तपास यंत्रणांनी अटक केली होती. वाझेंचा जामीन मंजूर झाला तर ते इतर साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतात, असं म्हणत ईडीने वाझेंच्या जामीन अर्जाला विरोध केला होता.
दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणी सचिन वाझे संपूर्ण कटाचा मुख्य दुवा असल्याचा दावा ईडीने केला आहे. ईडीने सचिन वाझेंना माफिचा साक्षीदार होण्याची ऑफर दिली असल्याचं देखील सांगितलं जात आहे.
थोडक्यात बातम्या-
‘अयोध्या दौऱ्याचा भोंगा बंद…’; राष्ट्रवादीची मनसेवर खोचक शब्दात टीका
‘अयोध्येत जाऊ तेव्हा संजय राऊतांना सोबत घेऊन जाऊ’; मनसेनं डिवचलं
अयोध्या दौरा स्थगित होताच राज ठाकरेंच्या तब्येतीबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर
सर्वात मोठी बातमी! राज ठाकरेंचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित
बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ; लालू प्रसादांच्या घरी सकाळी सकाळीच…
Comments are closed.