Top News

उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला सचिन अहिरांचं भाजपला जोरदार प्रत्युत्तर; म्हणतात…

मुंबई | आरे आणि नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले, आता दाऊदवरील गुन्हे मागे घेऊन ठाकरे सरकार त्याला क्लीनचीट देणार, असं म्हणत भाजपचे नेते मोहित भारतीय यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. यालाच शिवसेना नेते सचिन अहिर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

राज्यात सत्ता गेल्यामुळे भाजप नेते मोहित भारतीय दु:खी झाले आहेत. शिवसेना तुमच्यासोबत युतीमध्ये होती तेव्हा काम करु दिलं नाही, आता शिवसेना काम करतेय त्यावर टीका करत आहात, असं सचिन आहिर यांनी म्हटलं आहे.

भाजपने दाऊदला भारतात परत आणण्याचं आश्वासन दिलं, त्यावरील काही अपडेट्स मिळतील का? असा सवालही सचिन अहिर यांनी मोहित भारतीय यांना केला आहे.

दरम्यान, युवासेनेचे कोअर कमिटी सदस्य जय सरपोतदार यांनीही ट्विट करत मोहित भारतीय यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या