Top News महाराष्ट्र मुंबई

“कुठलाही संकल्प नसेल तर त्याला अर्थसंकल्प तरी कसं म्हणायचं?”

मुंबई | ज्यांच्या नोकऱ्या गेल्या त्यांना त्या परत कशा मिळतील, बंद पडलेले उद्योग पुन्हा कसे उभे राहतील याविषयी कुठलाही ‘संकल्प’ नसेल तर त्याला अर्थसंकल्प तरी कसं म्हणायचं?, अशा शब्दात शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर टीका केली आहे.

आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप, पायाभूत सुविधा आणि कृषी विकास या शब्दांचं नव्यानं वाजविलेलं तुणतुणं याशिवाय सामान्य जनतेला थेट दिलासा मिळेल असं काहीही या अर्थसंकल्पात नसल्याचं संजय राऊत यांनी अग्रलेखात म्हटलं आहे.

आरोग्य क्षेत्रासाठी इतके कोटी, ऊर्जा क्षेत्रासाठी तितके कोटी वगैरे मोठमोठे आकडे प्रत्येकच बजेटमध्ये सादर केले जातात. तशीच आकडेमोड या बजेटमध्येही मागच्या पानावरून पुढे आली असल्याचंही अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान, स्वप्नं दाखवणं, स्वप्न विकणं या कामात तर हे सरकार पारंगतच आहे. स्वप्नांचे इमले रचायचे आणि सोशल मीडियातील टोळधाडींच्या माध्यमातून त्याच स्वप्नांचे हवेतल्या हवेत मार्केटिंग करायचं, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“कोणत्या राज्यात कोणाची सत्ता आहे यावरून अर्थसंकल्प तयार होऊ लागला तर कसं व्हायचं?”

निवडणुका असलेल्या राज्यांना जास्त गिफ्ट, महाराष्ट्रासाठी काय?- आदित्य ठाकरे

संकटाचं संधीमध्ये रुपांतर कसं करतात हे दाखवणारा अर्थसंकल्प आहे- देवेंद्र फडणवीस

अर्थसंकल्पानं देशातील जनतेला मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलंय- अजित पवार

बजेटमध्ये आत्मनिर्भर भारतचं दर्शन, हा बजेट एक सकारात्मक बदल घडवेल- नरेंद्र मोदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या