बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अन्न, वारा आणि पाण्याइतकीच शिवसेना आवश्यक, पण…- संभाजी भिडे

सांगली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे शिवप्रतिष्ठानचे नेते संभाजी भिडे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज सांगली बंदची हाक दिली आहे. तसेच त्यांनी संजय राऊतांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

शिवसेना राज्यासह देशात वाढावी अशी आपली इच्छा आहे. कारण अन्न, वारा आणि पाण्याइतकीच शिवसेनेची देशाला गरज आहे. मात्र त्यासाठी संजय राऊत यांना पदावरुन हटवा, अशी हात जोडून विनंती संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना एकच विनंती आहे. त्यांनी राऊतांना आवरावं. त्यांच्यामुळे शिवसेना बदनाम होत आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ पदावरुन मुक्त करावं, अशी इच्छा आहे, असं भिडे म्हणाले आहेत. ते सांगलीत बोलत होते.

दरम्यान, उदयनराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे, असं वादग्रस्त वक्तव्य राऊतांनी केलं होतं. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

भिडेंच्या सांगली ‘बंद’ला संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

“माजी शिक्षण मंत्र्यांनी एवढे जीआर काढले की त्यांना घरी बसावं लागलं”

भिडेंच्या बंदला भीख घालू नका…;शिवसेना आक्रमक

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More