बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपचे ‘हे’ माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल

अकोला | भाजपचे खासदार व माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांची तब्येत अचानक खराब झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

गेल्या 2 दिवसांपासून संजय धोत्रे यांची तब्येत खराब झाल्याने त्यांना अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच ते काही दिवसांपासून तब्येतीच्या कारणाने अकोला येथील आपल्या निवासस्थानी आराम करत होते.

अकोला येथील खासगी रुग्णालयात सध्या धोत्रे यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे समर्थकांना चिंता न करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान, कालच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आता खासदार संजय धोत्रे यांची तब्येत खराब झाल्याने त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या –

“लवकरच पेट्रोल-डिझेल तारण कर्ज सुरू होणार”, मराठी अभिनेत्याचा खोचक टोला

…अन् वकिलांच्या ‘या’ जबरदस्त युक्तिवादामुळे आर्यनचा जामीन झाला मंजूर

“मनुवादी विचाराच्या सरकारने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवून बदनाम केलं”

सुपरस्टार रजनीकांत यांची प्रकृती बिघडली, कावेरी रुग्णालयात दाखल

फोन टॅपिंग प्रकरणातील ‘तो’ गोपनीय अहवाल फडणवीसांनी नाही तर या नेत्यांनी उघड केला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More