संजय राठोडांचं ठरलं; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर…
मुंबई | पूजा चव्हाण या युवतीच्या आत्महत्येनंतर राजकीय वर्तुळात मोठ्या हालचालींना वेग आला होता. या सर्व प्रकरणात राज्याच्या वनमंत्र्यांचं नाव पुढे आल्याने विरोधकांनी या प्रकरणावरून ठाकरे सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. आज संजय राठोड मंत्रीमंडळाच्या बैठकीपुर्वी मुख्यमंत्र्याची बैठक घेणार असल्याची माहिती समजते आहे.
संजय राठोड हे पूजा चव्हाण आत्महत्येनंतर चांगलेच अडचणीत आले आहेत. आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर पोहरादेवी येथे जाऊन महंतांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिस यंत्रणांना कामाला लावले आहे. तसेच सदरील प्रकरणाची चाैकशी निष्पक्ष होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
1 मार्च पासुन अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. विरोधकांनी या प्रकरणाला चांगलंच धारेवर धरलं असून संजय राठोड यांचा राजीनामा न घेतल्यास अधिवेशन होऊ देणार नाही असं सरकारला सांगितलं आहे. त्यामुळे आता सरकार यावर निर्णय घेणार की, संजय राठोड स्वत: राजीनामा देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात बऱ्याच गोष्टींचा खुलासा झाल्याने महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. राठोडांच्या राजीनाम्याच्या मागणीनंतर आता राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. यापुढे या प्रकरणाला काय वळण प्राप्त होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“मृत्यूनंतर माझ्या अस्थी बिअरमधून पबबाहेरील नाल्यात विसर्जित करा”
संजय राठोड प्रकरणी मुख्यमंत्री मोठा निर्णय घेणार?; संजय राऊतांच्या ‘त्या’ ट्विटमुळे चर्चांना उधाण
“नटाचा मृत्यू झाल्यावर खळबळ माजते पण सात वेळा खासदार झालेला माणूस जातो तेव्हा सगळे शांत”
लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी कायपण… ‘या’ भागात सुरु आहे अत्यंत धक्कादायक प्रकार
Comments are closed.