बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे सरकार नाही’, संजय राऊतांचा घणाघात

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व समर्थक आमदारांच्या बंडाळीनंतर तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले व वेगवेगळ्या विचारसणीचे पक्ष एकत्र येत तयार झालेलं महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) कोसळलं. अखेर अनेक दिवसांच्या सत्तासंघर्षानंतर शिंदे सरकार सत्तेत आलं.

भाजपच्या (BJP) पाठिंब्यानंतर शिंदे सरकार सत्तेत आलं व सर्वांना आश्चर्याचा धक्का देत एकानाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री झाले. शिंदे सरकार सत्तेत येऊन अनेक दिवस उलटले असले तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने विरोधकांनी टीका करायला सुरूवात केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे सरकारला फैलावर घेतलं असून फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे सरकार नाही, असा घणाघात केला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीनंतरही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही कारण हे सरकार बेकायदेशीर आहे, अशी टीका देखील राऊतांनी केली.

दरम्यान, अजून काहीच सुरू झाले नाही. अतीवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर सरकारचं लक्ष नाही. महाराष्ट्र वाऱ्यावर पडलाय राज्यपाल कुठे आहेत आता? राज्यपालांनी आता तरी घटनेचं पालन करावं, असं म्हणत राऊतांनी राज्यपालांवर देखील ताशेरे ओढले आहेत. तर मंत्रालय ठप्प पडलंय. शपथविधी होऊनही कामकाज सुरू नाही. मंत्री अजून का बनले नाहीत?, असा सवाल देखील राऊतांनी उपस्थित केला आहे.

थोडक्यात बातम्या-

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात ‘राज’पुत्राचा समावेश?, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

‘मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा?’, शरद पवारांचं मोठं वक्तव्य

“संजय राऊतांना हटवा, घर जाळायला हेच जबाबदार”

‘…तर उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री करण्याची वेळ राज्यपालांवर येईल’, राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा

मोठी बातमी! पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More