बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला- संजय राऊत

मुंबई | महाराष्ट्रातील सरकारी कार्यालयांवर भगवा ध्वज फडकवण्याविरोधात आपण सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं होतं. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय  राऊतांना प्रश्व विचारण्यात आला. त्यावर भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

भगवा झेंडा महाराष्ट्रावर किंवा शासकीय कार्यालयांवर फडकणे, हे आपले स्वप्न आहे, आपला स्वाभिमान आहे. स्वातंत्र्य लढ्यात भगव्याने अनेक स्वातंत्र्य सैनिकांना लढण्याची प्रेरणा दिली. तसेच अशा पद्धतीने भगवा फडकावणे हा अजिबात तिरंग्याचा अपमान नाही, असं संजय राऊत म्हणाले.

भगव्याचे तेज होते म्हणून हा देश स्वातंत्र्य लढ्यात लढू शकला. अनेक क्रांतीकार या भगव्या ध्वजाच्या तेजातून निर्माण झाले. त्यांच्या पाठीशी या भगव्या ध्वजाची आणि छत्रपती शिवरायांचीच प्रेरणा होती. हे जर कुणाला कळत नसेल, तर अशा लोकांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असं म्हणत राऊतांनी गुणरत्न सदावर्तेंवर निशाणा साधला.

ज्या दिवसाने आम्हाला स्वातंत्र्याची, स्वाभिमानाची आणि पहिले हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली, त्याला विरोध करणारे हे नतदृष्टे कोण आहेत?. सरकारने अशा घुबडांची काळजी न करता, फिकीर न करता, शिवरायांच्या या भगव्याची प्रतिष्ठा राहील अशा प्रकारे कठोर कारवाई करावी, असं राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“महाराष्ट्राला दीड कोटी लस देणार असल्यानं केंद्राची पुनावालांना तंबी, म्हणून ते लंडनला गेले”

आपापल्या भागातील परिस्थितीनुसार जिल्हा प्रशासनाने निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा- उद्धव ठाकरे

दिलासादायक! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येतही घट, जाणुन घ्या आकडेवारी

‘या’ जिल्ह्यात 2 आठवड्यात कोरोना रुग्णांची तब्बल 13 कोटींची लूट; तपासणीत धक्कादायक माहिती आली समोर

महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यात मान्सूनचं जोरदार आगमन

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More