बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जे पद मिळालं त्यापेक्षा राणेंची उंची मोठी, तरीही आमच्या शुभेच्छा”

मुंबई | मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलात एकूण 43 जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळात नारायण राणेंना स्थान देण्यात आलं आहे. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राणेंना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचं मंत्रिपद देण्यात आलं आहे. पण त्यांना जे पद मिळालं त्यापेक्षा त्यांची उंची मोठी आहे. तरीही आमच्या राणेंना शुभेच्छा आहेत. त्यांनी रोजगार आणि उद्योगांना संजीवनी द्यावी, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

अनेक जुन्या जाणत्या नेत्यांना बाजूला ठेवून मोदी सरकारने नव्या चेहऱ्यांना जबाबदारी दिली आहे. अर्थात त्यांची क्षमता पाहूनच त्यांना जबाबदारी दिली आहे. या मंत्र्यांनी आता महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान द्यावं. मधल्या काळात लहान उद्योग मरून पडला होता. त्याला संजीवनी देण्याचं आव्हान राणेंसमोर आहे, असं राऊत म्हणाले.

एकमात्र भाजपने शिवसेना, राष्ट्रवादीचे आभार मानले पाहिजेत. आमच्याकडून त्यांना जो पुरवठा झाला त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळासाठी चेहरे मिळाले. कपिल पाटील हे राष्ट्रवादीचेच प्रोडक्ट आहे. भारती पवारही राष्ट्रवादीच्याच होत्या. राणे तर शिवसेना, काँग्रेस करत भाजपमध्ये गेले. म्हणजे मंत्रिमंडळाचा मूळ चेहरा हा शिवसेना-राष्ट्रवादीचाच आहे, असा टोला राऊतांनी लगावला.

थोडक्यात बातम्या- 

“एका चांगल्या व्यक्तीला बळीचा बकरा बनवण्यात आलं, बिचारे डॉ. हर्षवर्धन…”

मोठी बातमी! प्रकाश आंबेडकर रजेवर; प्रभारी अध्यक्ष म्हणून केली ‘या’ व्यक्तीची नेमणूक

राज्यात पावसाचं कमबॅक! ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता

‘कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असतील, तर…’; अभ्यासातून महत्वाची माहिती आली समोर

“दिलीप कुमार नसलेली चित्रपटसृष्टी म्हणजे नेहरु-गांधी, ठाकरे नसलेलं राजकारण”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More