बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राहुल गांधींनी दाखवून दिलंय, कुणाची दादागिरी आता चालणार नाही”

मुंबई | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात स्वबळाचा नारा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं समोर आलं होतं.  शिवसेना तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या प्रकरणी नानांची कानउघाडणी देखील केली होती, मात्र आता याच्या पुढे जात शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी थेट सामना वृत्तपत्रातूनच काँग्रेस तसेच त्यांच्या नेतृत्त्वावर अग्रलेख लिहिला आहे.

सत्ता असेल किंवा नसेल मात्र पक्षासाठी झोकून देऊन काम करणारे झोकदार लोकच पक्ष संघटना टिकवीत असतात. असे लोक काँग्रेसकडे आता राहिलेले नाहीत. डरपोक लोकांना काँग्रेस पक्षात स्थान नाही असं राहुल गांधी म्हणतात मात्र काँग्रेस पक्ष हिंमतवान कार्यकर्ते तयार करण्याची फॅक्टरी आहे का? हे पाहावं लागेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

पंजाब काँग्रेसमधील कॅप्टन अमरिंदरसिंह आणि नवज्योतसिंह सिद्धू यांच्यात बऱ्याच दिवसांपासून संघर्ष होता. सिद्धू काँग्रेस सोडतील अशी चर्चा होती, मात्र राहुल गांधी यांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि त्यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लावली. आता पक्ष संघटनेत कुणाची दादागिरी चालणार नाही, हेच राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या कमजोरीचा फायदा पक्षातील नेते घेत आहेत. राजस्थान, पंजाब तसेच मध्य प्रदेशात गांधी कुटुंबाच्या नावानेच हे लोक निवडून येतात तसेच सत्तेवरही येतात व माझ्यामुळेच झाले अशी डिंग मारतात. या डिंगबाजीस पंजाबात तडा गेला आहे, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला अटक, कारण ऐकून हैराण व्हाल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पंढरपुरात शासकीय महापूजा संपन्न

“दरवर्षी मुंबई तुंबते…तीन पिढ्यांपासून बीएमसी चालवणारं ठाकरे कुटुंब फेल”

“माझ्यानंतर सलमानच्या किती गर्लफ्रेंड होत्या माहित नाही, मी त्याच्या संपर्कात नाही”

मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; आज नव्या बाधितांची संख्या आली 400 वर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More