बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईचं IFSC गुजरात नेलं यापेक्षा घशात 50 दिवसापासून दारूचा एक थेंब गेला नाही हे दु:ख मोठं; राऊतांची टीका

मुंबई | लॉकडाऊनच्या अंतसमयी ही जणू दिवाळीच होती. ‘वाईन शॉपच्या समोरची गर्दी पाहून असं वाटत होतं की, भारताची अर्थव्यवस्था पुढल्या चोवीस तासांतच सुरळीत होईल, असा विश्वास माझ्या एका सहकाऱ्याने व्यक्त केला. ‘कोरोना’मुळे जे संकट कोसळले ते अन्न-पाणी-निवारा, रोजगाराचे नसून खरे संकट हे ‘मद्यपीं’वरच कोसळले आहे. मुंबईतून आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातलानेले. हे अनेकांना दु:खद वाटले नाही कारण पोटात व घशात गेल्या 50 दिवसांपासून दारूचा थेंब गेला नाही हे दु:ख सगळ्यात मोठे, असा टोला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

सरकारला अखेर लोकाग्रहास्तव झुकावे लागले व निदान ‘वाईन’ शॉप नावाचा प्रकार तरी सर्वत्र सुरू करण्यात आला, हा आनंद काय वर्णावा? उमर खय्याम आज असता तर त्याने स्वत:ला धन्य धन्य मानले असते. दारू दुकानांसमोरच्या गर्दीने सर्व विक्रम मोडले. चाळीस दिवसांनंतर तहानलेले जीव इतक्या संख्येने बाहेर पडले. पण ‘लॉक डाऊन’मधल्या या आनंदयात्रेलाही शेवटी दृष्टच लागली. लोकांनी दारू किती प्यावी? कोलमडलेली अर्थव्यवस्था फक्त पिणाऱ्यांमुळेच ताठ उभी राहील, हा विचारही त्यातूनच उभा राहिला, अशा शब्दात राऊत यांनी दारू दुकाने आणि त्याबाहेर होणाऱ्या गर्दीवर रोखठोकमधून भाष्य केलं आहे.

उद्या दारूच्या दुकानातून घरी आल्यावर त्याला ओवाळा. त्याच्यावर पुष्पवृष्टी करा. कारण तो अर्थव्यवस्था मजबूत करतो आहे,’ असा नवा मंत्र सोशल माध्यमांवर कोणीतरी मांडला आहे तर दुसरा म्हणतोय, ‘अहो पोलीस मामा, मारता कशाला? आम्ही अर्थव्यवस्थेच्या आधाराचे ‘खंबे’ आहोत ‘खंबे’! काय समजलात?’ शेवटी सांगायचे ते इतकेच की, एका बाजूला आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र हातचे गेले म्हणून दु:ख आहेच, पण राज्याचा व देशाचा आर्थिक आधार भक्कम करण्यासाठी सरकारला दारूची दुकाने उघडावी लागली. तेसुद्धा खास लोकाग्राहास्तव! या आनंदात ते दु:ख जणू वाहून गेले, असंही राऊत म्हणाले आहेत.

उमर खय्याम या जमान्यात जिवंत असता तर तोसुद्धा मद्यप्रेमींची तडफड बघून खूष झाला असता. ‘वाईन शॉप म्हणजे मदिरालय सुरू करा एकदाचे’, हे सांगणारे यावेळी सगळ्याच स्तरांतील लोक होते. ‘आपण निधन पावल्यावर आपल्या देहाला मद्याने आंघोळ घालून एखाद्या अंगुरी बागेत पुरावे आणि तर्पणार्थ मदिरेचाच एक पेला उलटा करण्यात यावा’, अशी इच्छा उमर खय्यामने प्रकट केली होती. त्यामागचे इंगीत ‘लॉक डाऊन’ काळात स्पष्ट झाले, असं राऊत म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

मे महिन्याअखेरीस पुण्यातील रुग्णसंख्या 10 हजारावर पोहोचण्याचा अंदाज- आयुक्त शेखर गायकवाड

दिग्गजांना बाजूला सारत विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून ‘या’ युवा नेत्याला संधी

महत्वाच्या बातम्या-

दुकानं तसंच बांधकाम व्यवसाय सुरू करा; तज्ज्ञांच्या समितीचा अजित पवारांकडे अहवाल सुपूर्द

…पण अर्थव्यवस्था देखील पहावी लागेल, लॉकडाऊनवर गडकरींचं रोखठोक मत

पालघर हत्येच्या व्हिडीओतील नेतेमंडळी गृहमंत्र्यांच्या आजूबाजूला फिरतात- प्रवीण दरेकर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More