Top News देश

“पक्ष संकटात असताना बोटीतून उडी मारणाऱ्या उंदराप्रमाणे पायलट यांनी वागू नये”

मुंबई |  कोरोनाच्या संकटकाळात राजस्थानमध्ये राजकीय भूकंप घडणार असल्याचं चित्र आहे. उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचं निशाण फडकावलं आहे. मुख्यमंत्री अशोक गेलहोत आणि पायलट यांच्यात संघर्ष सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आजच्या सामना संपादकीयमधून पायलट यांना सल्ला देण्यात आला आहे.

संजय राऊत यांनी अग्रलेखात म्हटले आहे, ” पायलट यांची महत्त्वाकांक्षा राजस्थानचे मुख्यमंत्री बनण्याची आहे. ते आता उपमुख्यमंत्री व राज्य काँगेसचे अध्यक्ष आहेत. ते तरुण आहेत व भविष्यात त्यांना संधी आहे, पण गेहलोत द्वेषाने पछाडल्यामुळे त्यांना  भविष्यापेक्षा वर्तमानातच मोठा झगडा करून मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवायची आहे. हे त्यांचे पाऊल आत्मघातकी ठरेल.”

“मोदी व शहा यांनी प्रचंड यंत्रणा राबवून, झंझावात निर्माण करूनही राजस्थानात भाजपला सत्ता मिळाली नाही. लोकांचा कौल काँगेसच्या बाजूने होता. पायलट यांनी या विजयासाठी मोठी मेहनत घेतली हे मान्य, पण आज पक्ष संकटात असताना बोटीतून उडी मारणाऱया उंदराप्रमाणे वागून त्यांनी स्वतःला कलंकित करून घेऊ नये. आमदारांच्या घोडेबाजारप्रकरणी स्पेशल ऑपरेशन ग्रुपने सचिन पायलट यांना एक नोटीस पाठवली व पायलट यांच्या संयमाचा अंत झाला. हे सर्व गेहलोत यांनी घडवून आणले असा पायलट यांचा आरोप आहे, पण अशीच नोटीस खुद्द मुख्यमंत्री गेहलोत यांनाही पाठवली आहे.”

“पायलट यांचा अहंकार आणि व्यक्तिद्वेष राजस्थानसारखे राज्य अस्थिर करीत आहे, पण केंद्रीय सत्तेची फूस पायलट यांना असल्याशिवाय ते शक्य नाही. विरोधकांची सरकारे अस्थिर करायची या सूत्राने केंद्रीय सत्ता काम करीत आहे. देशापुढे कोरोनाने कोसळलेली अर्थव्यवस्था, लडाखमधील चिनी घुसखोरी असे अनेक प्रश्न आहेत. लडाख सीमेवरील आपल्या 20 सैनिकांचे सांडलेले रक्त अजून ताजे आहे. हे सर्व प्रश्न सोडवायचे राहिले बाजूला, काँगेसच्या अंतर्गत भांडणात टांग टाकून घोडेबाजारास उत्तेजन देण्याचे काम राजस्थानात सुरू आहे. वाळवंटात राजकीय उपद्व्याप करून वादळ निर्माण करून भाजप काय साध्य करणार आहे? अशाने संसदीय लोकशाहीचे वाळवंट होईल.”

ट्रेंडिंग बातम्या-

चिंताजनक! पुण्यात एकाच दिवसात 832 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

आयसीसच्या संपर्कात असलेल्या तरुणीचं बारामती कनेक्शन; पुण्यातून अटक

महत्त्वाच्या बातम्या-

“दिल्लीच्या राजकारणात अमित शहा देखील नवे… आम्ही म्हटलं, का नया है वह”

सोलापूर जिल्हा कारागृहात कोरोनाचा झाला होता उद्रेक, साखळी तोडण्यात प्रशासनाला यश!

प्लाझ्मा थेरपीसंदर्भात फसवणूक होण्यापासून सावधान!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या