बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण!

नागपूर | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवल्यामुळे लगेच त्यांची चाचणी करण्यात आली.

संघानं शुक्रवारी रात्री उशिरा ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. मोहन भागवत यांची आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आली आहेत. त्यांच्यामध्ये काही हलकी लक्षणं असल्यानं त्यांना नागपुरातील किंग्जवे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील रात्री उशिरा याबाबत ट्विट केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आदरणीय डॉ. मोहनजी भागवत यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली. त्यांना लवकरच बरं वाटावं, अशी देवाकडे प्रार्थना करतो, असं गडकरी यांनी म्हटलं.

नागपूर, पुणे आणि मुंबई यासारख्या शहरांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार अधिक झपाट्यानं होतं असल्याचं चित्र आहे. राज्यात आजपासून विकेंड लॉकडाऊनही सुरू झालं आहे.

थोडक्यात बातम्या-

खळबळजनक! आणखी एका रूग्णालयातील 35 डॉक्टरांना लस घेतल्यानंतरही झाली कोरोनाची लागण

आरोपांकडे लक्ष देऊ नका, कामावर भर द्या- नरेंद्र मोदी

नागपूरच्या वेल ट्रीट कोरोना रुग्णालयाला आग; 4 जणांचा मृत्यू

” उद्धव ठाकरेंना 40 दिवसांमध्ये मुख्यमंत्रीपद सोडावं लागेल”

जम्बो कोविड सेंटर खासगी रुग्णालयांनी दत्तक घ्यावेत- उद्धव ठाकरे

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More