मुंबई | वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेला 33 कोटी वृक्षलागवडीच्या प्रकल्पावर अभिनेते सयाजी शिंदे यांनी हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातील वृक्षलागवड हे तर थोतांड आणि नाटक आहे, अशी टीका त्यांनी राज्य सरकारवर केली आहे.
33 कोटी वृक्षलागवडीचा संकल्प वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोडला होता. त्यावर किती ग्रामपंचायतीने 3 हजार झाडे लावली?? 33 कोटी वृक्ष लावल्यावर जपणार कोण आणि कसं? याची उत्तरे सरकारने द्यावी, असं सयाजी शिंदे म्हणाले.
झाडं लावल्यावर त्यासाठी पाणी आणणार कुठून?? झाडे लावल्यावर त्याला जगवण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा हिशेब सरकारने द्यावा, असंही सयाजी शिंदे म्हणाले आहेत.
दरवर्षी त्याच-त्याच खड्ड्यात जाऊन मंत्री झाडं लावलात. त्यांना झाडाची जात देखील माहिती नसते, असा निशाणाही त्यांनी यावेळी सरकारवर साधला.
महत्वाच्या बातम्या-
-अनुष्कासोबतच्या नात्याबाबत प्रभासनं मौन सोडलं; म्हणतो…
-शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंनी पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र; म्हणतात…
“राहुल-प्रियांका यांनी रक्षाबंधन साजरा केलेला फोटो दाखवा आणि बक्षिस घेऊन जा!”
-RSS सरकारच्या कामामध्ये हस्तक्षेप करतं; सरसंघचालक मोहन भागवत यांची कबुली
-पोलीस मुख्यालयात गळफास घेऊन API ची आत्महत्या; पोलीस दलात खळबळ
Comments are closed.