बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“घरावर दरोडा घालून माझ्या 2 गाड्या चोरल्या”; परमबीर सिंह आणि प्रदीप शर्मावर गंभीर आरोप

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बाँम्बमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे महाविकास आघाडी विरूद्ध परमबीर सिंग असा सामना पहायला मिळाला होता. त्यानंतर आता परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. परमबीर सिंग आणि प्रदीप शर्मा यांच्याविरोधात व्यावसायिक मयुरेश राऊत यांनी गंंभीर आरोप केले आहेत.

माझ्याविरोधात कोणतीही तक्रार नसताना मला खंडणी विरोधी पथकात तीन दिवस डांबून ठेवले आणि मारहाण केली, असा व्यावसायिक मयुरेश राऊत यांचा आरोप आहे. परमबीर सिंह यांच्यासह माजी पोलीस अधिकारी, एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा आणि ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी राजकुमार कोथमिरे आणि इतर पोलिसांवर हे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

पोलिसांनी 2017 मध्ये माझ्या घरात दरोडा टाकला होता. त्यावेळी माझ्या दोन गाड्या चोरी करण्यात आल्या, असा दावा राऊत यांनी केला आहे. पोलिसांनी बेकायदेशीर पद्धतीने ताब्यात घेतलेल्या गाड्यांचा वापर मनसुख हिरेन सारख्या प्रकरणात होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. पोलीस महासंचालक आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मयुरेश राऊत यांनी पत्र लिहलं आहे. त्यामधून त्यांनी ही कैफियत मांडली आहे.

दरम्यान, क्रिकेट बुकी सोनू जालान याने परमबीर सिंग यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले होते. 2018 मध्ये परमबीर सिंग यांनी मकोका लावून 3 कोटी 45 लाख रुपये वसूल केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

मराठा आरक्षणाच्या निकालाआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलवली तातडीची बैठक

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, पण मृतांचा आकडा वाढला

‘ड्रॅगनचे पाप, जगाला ताप; चिनी रॉकेट्स कोसळून जगाचा नरक करणार’

अखेर मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली लागणार; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

निक्की तांबोळीचा भाऊ जतिन तांबोळी याचं कोरोनाने निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More