‘शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरेंना त्रास दिला’; राज ठाकरेंचा गंभीर आरोप
औरंगाबाद | राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात दुसऱ्या जातींबद्दल द्वेष सुरु झाला, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शरद पवारांवर केला आहे. ते औरंगाबादमधील सभेत बोलत होते.
शरद पवारांनी वृद्धापकाळात बाबासाहेब पुरंदरे यांना त्रास देण्यास सुरुवात केली. कारण बाबासाहेब पुरंदरे ब्राम्हण होते, असा आरोपही राज ठाकरेंनी केला आहे.
पवार साहेबांना हिंदू या शब्दाची अॅलर्जी आहे. हा महाराष्ट्र शाहू, फुले आंबेडकरांचा आहे पण त्याआधी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, असं राज ठाकरे म्हणालेत.
दरम्यान, शरद पवार नास्तिक आहे हे म्हटल्यावर त्यांना झोंबले. त्यानंतर देवाचे, पूजेचे फोटो बाहेर काढले. परंतु शरद पवारांच्या कन्येने स्वत: लोकसभेत याची कबुली दिली आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी पवारांवर निशाणा साधलाय.
थोडक्यात बातम्या-
शरद पवारांना नास्तिक बोललो तर झोंबलं, पण त्यांची कन्याच…- राज ठाकरे
Raj Thackeray | भाषण चालू असताना सभेत गोंधळ, राज ठाकरे म्हणाले ‘चौरंग करून घरी पाठवेल’
मी अभिमानाने सांगतो बाबरी पाडताना मी तिथंच होतो- देवेंद्र फडणवीस
“भोंगे काढायला लावले तर यांची हातभर फाटली आणि म्हणतात आम्ही बाबरी पाडली”
“देवेंद्रजी खरंच 30-35 पोळ्या खायचे?”, अमृता फडणवीस म्हणाल्या…
Comments are closed.