बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्धव ठाकरेंभोवतालच्या ‘त्या’ कोंडाळ्यात कोणते नेते?, शहाजीबापू पाटलांनी यादीच सांगितली

मुंबई | चार लोकांच्या कोंडाऱ्यानं आमच्या उद्धव साहेबांना बावरट केलं, अशी खदखद बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली होती. गुलाबराव पाटलांप्रमाणे इतर बंडखोर आमदारांनी देखील हाच आरोप केला. मात्र, संजय राऊत सोडून इतर कोणाचंच नाव या आमदारांच्या तोंडून आलं नाही.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भोवताली कोणत्या विशिष्ट नेत्यांचं कोंडाळं होतं, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यात आता काय झाडी… काय डोंगार.. काय हाटेल फेम आमदार शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचू न देणाऱ्यांची यादीच जाहीर केली आहे.

पहिला नेता म्हणजे संजय राऊत. त्यानंतर अनिल देसाई, मिलींद नार्वेकर, विनायक राऊत, अरविंद सावंत, हे कोंडाळं उद्धव ठाकरेंना काहीच उमजून देत नव्हतं, असा घणाघात शहाजीबापूंनी केला. तर कोणत्याही कार्यक्रमात उद्धव ठाकरे याच नेत्यांच्या कोंडाळ्यातून यायचे जायचे आणि आम्ही बाजूलाच राहायचो, अशी खंत देखील शहाजीबापू पाटील यांनी बोलून दाखवली.

दरम्यान, उद्धव ठाकरे मोठे नेते असले तरी आमचा नेता एकनाथ शिंदेच आहे. तसेच एकनाथ शिंदे करूणामय आणि दयाळू अंत:करणाचे नेते आहेत, असं देखील शहाजी बापू पाटील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

सावधान! व्हॉट्सअ‍ॅप वापरताय तर ‘या’ गोष्टीचं पालन अनिवार्य, अन्यथा होऊ शकते कारवाई

शिंदे गटाचं समर्थन भावना गवळींच्या अंगलट?, शिवसेनेनं प्रतोद पदावरून केली उचलबांगडी

“शिंदे-फडणवीसांची जोडी फेविकॉल पेक्षाही घट्ट”

‘योग्य वेळ पाहिली आणि…’, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

बिअर तुमच्या शरीरासाठी ठरू शकते वरदान; संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More