बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का?? राहुल गांधींच्या भेटीनंतर शरद पवार म्हणतात..

नवी दिल्ली | राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार… असं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रसारित केलं होतं. साहजिकच या वृत्ताने देशाच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता होती. मात्र राहुल गांधी-शरद पवार यांच्या भेटीनंतर स्वत: शरद पवारांनी या वृत्ताचे खंडन केलंय. यावर पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

विलिनीकरणासंदर्भात आमच्या भेटीत कुठलीही चर्चा झाली नाही. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला ज्या प्रकारे पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यावर आमच्यात चर्चा झाली, असं शरद पवार म्हणाले.

चार महिन्यांवर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आहे. त्या दृष्टीने आगामी काळात रणनिती ठरवण्याची गरज आहे, असंही पवार म्हणाले.

तुम्हाला राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर आहे का?या पत्रकारांच्या प्रश्नावर नेतृत्वाची कमतरता असल्यामुळे कदाचित त्यांना वाटत असावं, असं हसत हसत त्यांनी उत्तर दिलं.

महत्वाच्या बातम्या

-…म्हणून बाळासाहेब मला ‘रोडकरी’ म्हणायचे; गडकरींनी सांगितला किस्सा

-काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता म्हणतो; काँग्रेसला अमित शहांसारख्या नेत्याची गरज

-राहुल गांधी शरद पवारांच्या भेटीला; राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार???

-महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांना मोदी सरकारमध्ये मंत्रिपदं!

-जो मातोश्रीला पैसे पाठवणार तोच मंत्री होणार- निलेश राणे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More