Top News महाराष्ट्र मुंबई राजकारण

‘शरद पवार तेव्हा संसदेत मोदींच्या चेम्बरमध्ये का गेले होते?’

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवसेना खासदार संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. मी स्वतः तेव्हा संसदेतील नरेंद्र मोदी यांच्या चेंबरमध्ये गेलो होतो, असं विधान पवारांनी या मुलाखतीत केलं आहे. मोदींच्या चेंबरमध्ये जाऊन पवारांनी नक्की काय संवाद साधला, हे खुद्द शरद पवार यांच्या तोंडून ऐकणं आता औत्स्युक्याचं ठरणार आहे.

शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनातून शरद पवारांची मुलाखत उद्या (११ जुलै) प्रसिद्ध केली जाणार आहे. वाचकांची उत्सुकता वाढविण्यासाठी संजय राऊत या मुलाखतीचे काही अंश ट्विट करत आहेत. या मुलाखतीच्या तिसऱ्या प्रोमोत आपण स्वतः मोदींच्या चेंबरमध्ये गेल्याचं पवारांनी सांगितलं आहे. याचा खुलासा आता लवकरच मुलाखतीतून होणार आहे.

 

शरद पवारांनी या मुलाखतीत अनेक राजकीय गौप्यस्फोट केल्याची माहिती समोर आली आहे. राम मंदिर आंदोलन, राजकारणातील किस्से, महाविकासआघाडी, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी आणि सध्याचं लाॅकडाऊन या सर्वच मुद्द्यांवर पवारांनी मनमोकळा संवाद साधला आहे.

दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटिस देण्यात आली. यावर मत मांडताना, “सत्तेचा दर्प डोक्यात गेला की अशा गोष्टी घडतात”, अशी बोचरी टीकाही पवार यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

क्रूरतेचा हैवाण होता विकास दुबे; हत्येनंतर 5 मृतदेहांसोबत जे केलं ते ऐकून अंगावर काटा येईल!

विकास दुबे एन्काऊंटर प्रकरण; 4 पोलीस जखमी

विकास दुबे हत्याकांड; काल ‘या’ व्यक्तीनं केली एन्काऊंन्टरची मागणी, आज झाली सत्य घटना…

कसा मारला गेला विकास दुबे?, जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

विकास दुबेला घेऊन जाणाऱ्या गाडीला अपघात; पळून जाणाऱ्या दुबेचा एन्काऊंटर!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या