Top News

शरद पवारांचं ‘या’ पक्षाला सत्तेत सहभागाचं आश्वासन

मुंबई | राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची निवासस्थानी भेट घेतली. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या प्रस्तावानंतर शरद पवारांनी पक्षाला सत्तेत सहभागी करुन देण्याचं आश्वासन दिलं.

महाराष्ट्रात नुकतंच सत्तारुढ झालेल्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये सहभागी करावं, असा प्रस्ताव राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षातर्फे अण्णासाहेब कटारे यांनी शरद पवारांसमोर ठेवला होता. त्यावर पवारांनी सकारात्मक उत्तर दर्शवलं असल्याचं कळतय.

2014 आणि 2019 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता राष्ट्रवादीच्या सर्वच उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जीवापाड मेहनत घेतली, असं अण्णासाहेब कटारे यांनी सांगितलं.

काँग्रेससोबत आघाडीमध्ये लढलेल्या राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीत 54 जागा जिंकल्या होत्या, मात्र लोकसभा निवडणुकीत पक्षाला केवळ चारच जागा जिंकता आल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या