पुणे महाराष्ट्र

“पक्षाला तुमची गरज आहे…पक्ष सोडू नका; उदयनराजेंचं मी बघतो”

सातारा | उदयनराजेंचं मी बघतो, पक्षाला तुमची गरज आहे. तुम्ही पक्ष सोडू नका, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवेंद्रराजे यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली. या बैठकीत शिवेंद्रराजेंनी पवारांसमोर आजवर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचून दाखवला. या बैठकीनंतरही शिवेंद्रराजे राष्ट्रवादी सोडण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं समजतंय.

खासदार उदयनराजेंशी कितीही प्रामाणिक राहिलो तरीही ते आपल्याविरोधात कुरघोड्या करतच आहेत. ते पक्षाविरोधात नेहमी बोलत असतात, असं शिवेंद्रराजेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, उदयनराजेंवर पक्ष कोणतीच कारवाई करत नाही, असं सांगत शिवेंद्रराजेंनी पवारांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी आझम खान यांनी मागितली माफी!

-…तर अजित पवारांनीच सर्वात पहिला भाजपमध्ये प्रवेश करायला हवा होता!

-येडियुरप्पांनी कर्नाटकमध्ये अखेर कमळ फुलवलं; बहुमत परीक्षणात पास

-बिचुकले इज बॅक; ‘या’ दिवशी घेणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री

-राजू शेट्टी नारायण राणेंच्या भेटीला; राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या